
“अजित दादांनी मावळसाठी जे केलं आता आपली बारी”
श्रद्धांजली म्हणून मावळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार
मावळ
3 फेब्रुवारी 2026
अजित दादांच्या निधनानंतर मावळात सर्वत्र शोकभावना असून, त्याचबरोबर त्यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण आणि श्रद्धांजली व्यक्त करण्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. मावळच्या विकासासाठी अजित दादांनी दिलेले योगदान, मावळचा कायापालट घडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि विकासाला दिशा देणारी धडाडी या सगळ्याची आठवण ठेवून मावळच्या नागरिकांनी एक स्पष्ट भूमिका घेतली आहे.

मावळच्या विकासासाठी “काम, निधी आणि निर्णय” या तीन आधारांवर अजित दादांनी जे उभं केलं, ते पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी मावळकरांनी आता “आपली बारी” मानली आहे. त्यामुळे अजित दादांना श्रद्धांजली म्हणून, मावळमधील विविध गावांतील नागरिक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या निर्णयामागे राजकारण नाही, तर मावळच्या विकासाचा पुढचा टप्पा पूर्ण करण्याची जबाबदारी आणि अजित दादांच्या कार्याला खरी श्रद्धांजली देण्याची भावना आहे. विकासाचे काम थांबू नये, योजना आणि निधीच्या दृष्टीने मावळचा वेग कायम राहावा, आणि मावळचा परिवर्तनाचा प्रवास अधिक मजबूत व्हावा,यासाठी एकत्र येण्याची गरज मावळकरांनी व्यक्त केली आहे.




Comments