top of page
MAX MAVAL



मावळ भाजपची मासिक बैठक संपन्न; जनगणना, घरगणना व मतदार यादी पुनर्निरीक्षणावर चर्चा
वडगाव मावळ, प्रतिनिधी : मावळ तालुका भारतीय जनता पक्षाची मासिक बैठक आज पक्ष कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत सध्या शासन स्तरावर सुरू असलेल्या जनगणना, घरगणना तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. बैठकीत मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या "उठो! जागो! और लक्ष प्राप्ती तक रुको मत" या संदेशाचा उल्लेख करत कार्यकर्त्या

Max Maval
Jun 11 min read


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात पोलिसांचा रूट मार्च
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात पोलिसांचा रूट मार्च मावळ तालुक्यातील वडगाव मावळ शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांकडून बुधवारी (दि. 27 मे 2026) सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला. सायंकाळी 6 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये हा रूट मार्च घेण्यात आला. पंचायत समिती चौक, श्री पोटोबा महाराज मंदिर परिसर, जमा मजीद, ढोरेवाडा, मोरया चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मिलिंद नगर चौक, कुडे वाडा, चावडी चौक

Max Maval
May 271 min read


पवना डॅम अल्पवयीन अत्याचार प्रकरण पीडित मुलीच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली प्रशासनाची बैठक लोणावळा
पवना डॅम अल्पवयीन अत्याचार प्रकरण पीडित मुलीच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली प्रशासनाची बैठक लोणावळा | दि. ८ मे २०२६ मावळ तालुक्यातील जवन (पवना डॅम) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोणावळा येथे वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या प्रकरणात ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद स

Max Maval
May 82 min read


जाहीर आवाहन : मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 प्रक्रिया सुरू
🔴 जाहीर आवाहन : मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 प्रक्रिया सुरू तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिक मतदारांना कळविण्यात येते की, विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान अद्याप अनेक मतदारांचे मॅपिंग प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. 📅 ३ मे ते ९ मे दरम्यान प्रक्रिया नगरपरिषदेच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, दिनांक ३ मे २०२६ ते ९ मे २०२६ या कालावधीत, आपण ज्या मतदान केंद्रावर

Max Maval
May 21 min read


पुणे–लोणावळा लोकल सेवेत कपात : सर्वसामान्यांचा वाढता आक्रोश
पुणे–लोणावळा लोकल सेवेत कपात : सर्वसामान्यांचा वाढता आक्रोश लेखक: राजेंद्र नामदेव कांबळे पुणे–लोणावळा लोकल सेवा ११ मार्च १९७८ रोजी सुरू झाली आणि तेव्हापासून ही सेवा हजारो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली. विद्यार्थी, कामगार, लहान व्यावसायिक—सर्वसामान्य माणसासाठी ही लोकल म्हणजे जीवनरेखा होती. अनेक दशकांपर्यंत ही सेवा नियमित आणि विश्वासार्ह राहिली. विशेष म्हणजे २०१७ पर्यंत कधीही मेंटेनन्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्याचे चित्र दिसले नाही. मात्र आज

Max Maval
Apr 232 min read


सावळा ग्रामीण मार्गावरून ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक; सुरक्षा व परवानगीचा प्रश्न
टाकवे भोयरे – सावळा ग्रामीण मार्गावरून ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक; सुरक्षा व परवानगीचा प्रश्न मावळ तालुक्यातील टाकवे भोयरे ते सावळा हा ग्रामीण मार्ग असून या मार्गावरून ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. सदर मार्ग हा जड वाहनांसाठी अधिकृत नसतानाही काही वाहने या रस्त्यावरून मालवाहतूक करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या टाटा कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक केली जात आहे. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या काही ओ

Max Maval
Mar 141 min read


लेखणीच्या बळावर न्यायाची लढाई : पत्रकार उत्तम ठाकर यांचा प्रेरणादायी प्रवास
ग्रामीण प्रश्नांना वाचा फोडणारी निर्भीड पत्रकारिता; समाजहितासाठी सातत्याने झटणारा चेहरा पवनानगर : पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून ती समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या तत्वाची प्रचिती आपल्या कार्यातून देणारे पत्रकार उत्तम ठाकर यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा घेतलेला हा विशेष आढावा. ग्रामीण भागाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका ग्रामीण भा

Max Maval
Feb 282 min read


जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या सामुदायिक सोहळा २०२६ च्या अध्यक्ष पदी प्रविण भवार तर महासचिव पदी प्रतिक देसाई….
*जनहित चॅरिटेबल ट्रस्ट* च्या वतीने नुकतीच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ ची सोहळा नियोजन समिती जाहीर करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रविण भगवान भवार यांची बहुमताने *अध्यक्ष पदी तर ट्रस्टचे हितचिंतक व सामाजिक कार्यकर्ते प्रतिक सुरेश देसाई यांची महासचिव पदी निवड जाहीर करण्यात आली. ट्रस्टच्या वतिने २०१९ पासून दरवर्षी सामुदायिक मंगल परिणय सोहळा घेण्यात येतो. महाराष्ट्र राज्यात एकमेव सामुदायिक बौद्ध सोहळे करणारी ट्रस्ट म्हणून या जनहित चॅर

Max Maval
Feb 272 min read


मावळच्या राजकारणात पैशांचा प्रभाव? — लोकशाही कुठे उभी आहे?
पुणे जिल्ह्यातील मावळ हा भाग परंपरेने सामाजिक चळवळी, सहकार आणि स्थानिक नेतृत्वासाठी ओळखला जातो. गावपातळीवर काम करणाऱ्या नेत्यांना लोकांनी उचलून धरले, त्यांच्या सामाजिक योगदानावर राजकीय स्थान ठरत असे. पण आज परिस्थिती बदलताना दिसत आहे, आणि हा बदल नागरिकांच्या चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. निवडणूक हा लोकशाहीचा सण मानला जातो. मात्र, अलीकडील निवडणुकांकडे पाहिल्यास हा सण खर्चिक स्पर्धेत बदलत चालल्याचे चित्र दिसते. प्रचारातील मोठ्या प्रमाणातील खर्च, कार्यकर्त्यांची मांडणी, वाहनफेऱ्या

Max Maval
Feb 181 min read


महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा वाढिवळे (प्रतिनिधी):
🕉️ महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव परिसरात मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून सालाबादप्रमाणे याही वर्षी वाढिवळे येथे भव्य उरूस भरला आहे. उरूसामध्ये खेळणी, फराळ, पाळणे तसेच विविध वस्तूंची दुकाने लागली असून नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे. तसेच वाडुळे व चिखलचे येथील खिंडीत असलेल्या केदारनाथ मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली आहे. यासोबतच कामशेत शहराती

Max Maval
Feb 151 min read


*लोहगडावर महाशिवरात्रीची जय्यत तयारी सुरू*
*श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे* महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रात्री ९ वाजता लोहगड येथील मारुती मंदिरात लोहगड, घेरेवाडी व भाजे येथील भजनी मंडळांच्या वतीने हरिजागर करण्यात येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता लोहगडावरील महादेव मंदिरात तळेगाव नगर

Max Maval
Feb 132 min read


अंतिम फेरी अखेर कोणाला किती मत संपूर्ण यादी
खडकाळा सोमाटणे टाकावे इंदुरी कुसगाव

Max Maval
Feb 91 min read


35 वर्षांनंतर पुणे–मुंबई महामार्गावर पुन्हा भीषण वाहतूक कोंडीचा अनुभव
पुणे–मुंबई महामार्गावर 90 च्या दशकात एखादा मोठा अपघात झाला की दोन-दोन दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा. तब्बल 35 वर्षांनंतर आज पुन्हा एकदा महामार्गाने तोच अनुभव नागरिकांना दिला. महामार्गावर गॅस वाहून नेणारा कंटेनर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ वाहतूक थांबवण्यात आल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून या रांगा तब्बल 20 ते 30 किलोमीटरपर्यंत पोहोचल्या. या घट

Max Maval
Feb 51 min read


स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी आम्ही सर्वजण दिपाली दीपक हुलावळे व समीर जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत
कान्हे, नायगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केला निर्धार लोणावळा : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांचे शिलेदार म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असलेल्या कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार व पीएमआरडीएच्या सदस्य दिपाली दीपक हुलावळे व कामशेत पंचायत समिती गणाचे तरुण तडफदार उमेदवार समीर जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत व आमच्या कान्हे, आंबेवाडी, नायगाव,

Max Maval
Feb 32 min read


“अजित दादांनी मावळसाठी जे केलं आता आपली बारी”
श्रद्धांजली म्हणून मावळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार मावळ 3 फेब्रुवारी 2026 अजित दादांच्या निधनानंतर मावळात सर्वत्र शोकभावना असून, त्याचबरोबर त्यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण आणि श्रद्धांजली व्यक्त करण्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. मावळच्या विकासासाठी अजित दादांनी दिलेले योगदान, मावळचा कायापालट घडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि विकासाला दिशा देणारी धडाडी या सगळ्याची आठवण ठेवून मावळच्या नागरिकांनी एक स्पष्ट भूमिका घेतली आ

Max Maval
Feb 31 min read


राष्ट्रवादीचे उमेदवार दिपाली दीपक हुलावळे व रेश्मा राजू देवकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द
कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील गावांनी दिला राष्ट्रवादीचे उमेदवार दिपाली दीपक हुलावळे व रेश्मा राजू देवकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द लोणावळा : पुणे जिल्हा परिषदेच्या कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीच्या अधिकृत उमेदवार व पीएमआरडीएच्या सदस्य दिपाली दीपक हुलावळे तसेच मावळ पंचायत समितीच्या कार्ला गणाच्या उमेदवार रेश्मा राजू देवकर या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या क

Max Maval
Feb 22 min read


राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला ब्रेक; शरद पवारांची स्पष्ट भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि येत्या १२ तारखेला अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा होणार होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला कोडा घातला गेला असून ही प्रक्रिया थांबली आहे, असंही शरद पवार म्हणाले. यामुळ

Max Maval
Jan 311 min read


सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; राज्याच्या राजकारणात नवा इतिहास
मुंबई : राज्याच्या राजकारणात उद्या एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळणार असून सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीमुळे राज्याला पहिली महिला उप मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे जनता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या रुपात पाहत असून, त्याच कार्यपद्धतीने त्या काम करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. स्पष्ट भूमिका, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जाणारे

Max Maval
Jan 301 min read


कामशेत येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळच्या माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
कामशेत : कामशेत येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळ विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत आपली भावना व्यक्त केली. “दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असून राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या दूरदृष्टीपूर

Max Maval
Jan 291 min read


शालेय विद्यार्थ्यांची बारामती कृषी प्रदर्शनास शैक्षणिक भेट
शालेय विद्यार्थ्यांची बारामती कृषी प्रदर्शनास शैक्षणिक भेट कामशेत : फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया (FALI) व एस.बी.आय फाउंडेशन यांच्या सहकार्याने महर्षी कर्वे आश्रम शाळा,कामशेत तसेच प्रतिक विद्यानिकेतन,निगडे येथील विद्यार्थ्यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनास शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीत वापरले जाणारे नवनवीन तंत्रज्ञान,ए.आय आधारित शेती उपकरणे, अॅग्रोटेक्निक रोबोटिक्स,मधुमक्षिकापालन,मत्स्यपालन तसेच पशुपालन यांसारख्या विविध विषयांची प्रत्

Max Maval
Jan 291 min read

bottom of page

















