
शालेय विद्यार्थ्यांची बारामती कृषी प्रदर्शनास शैक्षणिक भेट
शालेय विद्यार्थ्यांची बारामती कृषी प्रदर्शनास शैक्षणिक भेट
कामशेत :
फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया (FALI) व एस.बी.आय फाउंडेशन यांच्या सहकार्याने महर्षी कर्वे आश्रम शाळा,कामशेत तसेच प्रतिक विद्यानिकेतन,निगडे येथील विद्यार्थ्यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनास शैक्षणिक भेट दिली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीत वापरले जाणारे नवनवीन तंत्रज्ञान,ए.आय आधारित शेती उपकरणे, अॅग्रोटेक्निक रोबोटिक्स,मधुमक्षिकापालन,मत्स्यपालन तसेच पशुपालन यांसारख्या विविध विषयांची प्रत्यक्ष माहिती घेतली. प्रदर्शनातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीच्या संकल्पना समजावून सांगितल्या.
ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी कृषी शिक्षिका प्रेरणा साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी कुतूहल व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला.




Comments