बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात पोलिसांचा रूट मार्च
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरात पोलिसांचा रूट मार्च
मावळ तालुक्यातील वडगाव मावळ शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांकडून बुधवारी (दि. 27 मे 2026) सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला.
सायंकाळी 6 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये हा रूट मार्च घेण्यात आला. पंचायत समिती चौक, श्री पोटोबा महाराज मंदिर परिसर, जमा मजीद, ढोरेवाडा, मोरया चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मिलिंद नगर चौक, कुडे वाडा, चावडी चौक, माळीनगर, केशवनगर तसेच विशाल लॉन्स परिसरात पोलिसांनी पायदळ गस्त घालत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला.
या रूट मार्चमध्ये 1 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस अंमलदार तसेच 10 होमगार्ड सहभागी झाले होते.
बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.




Comments