top of page
Search

मावळ भाजपची मासिक बैठक संपन्न; जनगणना, घरगणना व मतदार यादी पुनर्निरीक्षणावर चर्चा

Jun 1
1 min read


वडगाव मावळ, प्रतिनिधी : मावळ तालुका भारतीय जनता पक्षाची मासिक बैठक आज पक्ष कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत सध्या शासन स्तरावर सुरू असलेल्या जनगणना, घरगणना तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या.


बैठकीत मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या "उठो! जागो! और लक्ष प्राप्ती तक रुको मत" या संदेशाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी आणि पक्ष संघटन बळकट करण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन केले. येणारा काळ हा नवी दिशा आणि नवी संधी देणारा असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे कामाला लागावे, असा उपदेश त्यांनी केला.

यावेळी गणेशतात्या भेगडे, बाबुराव वायकर, सुरेखाताई जाधव, गुलाबकाका म्हाळसकर, शांताराम कदम यांच्यासह लोणावळा, तळेगाव व वडगाव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठक संपल्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांची भेट घेतली. तालुक्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विशेष बैठक घेऊन ती कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 
 
 

Comments


bottom of page