top of page
Search

कामशेत येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळच्या माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Jan 29
1 min read

कामशेत : कामशेत येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळ विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत आपली भावना व्यक्त केली. “दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असून राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली,”अशा शब्दांत वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.श्रद्धांजली वाहत असताना महिला कार्यकर्त्या भावुक झालेल्या होत्या.

तसेच मावळ विधानसभेच्या पहिल्या महिला माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. मावळ तालुक्याच्या विकासासाठी यांचेही खूप मोठे योगदान होते.सर्वसामान्य नागरिकांशी असलेले त्यांचे नाते, विकासकामांप्रती असलेली तळमळ आणि महिला सशक्तीकरणासाठी केलेले योगदान उपस्थितांनी स्मरणात आणले.


या शोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून व पसायदान येऊन दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम शांत व भावनिक वातावरणात पार पडला.

 
 
 

Comments


bottom of page