top of page
Search

राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला ब्रेक; शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Jan 31
1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि येत्या १२ तारखेला अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा होणार होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

मात्र, सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला कोडा घातला गेला असून ही प्रक्रिया थांबली आहे, असंही शरद पवार म्हणाले. यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पत्रकारांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत विचारणा केली असता, शरद पवारांनी “याबाबत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती,” असं सांगत निर्णयप्रक्रियेत आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांनी पक्षातील अंतर्गत संवादातील दरी, तसेच एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये निर्माण झालेला तणाव उघडपणे समोर आणला आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 
 
 

Comments


bottom of page