top of page
Search

सावळा ग्रामीण मार्गावरून ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक; सुरक्षा व परवानगीचा प्रश्न

Mar 14
1 min read

टाकवे भोयरे – सावळा ग्रामीण मार्गावरून ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक; सुरक्षा व परवानगीचा प्रश्न

मावळ तालुक्यातील टाकवे भोयरे ते सावळा हा ग्रामीण मार्ग असून या मार्गावरून ओव्हरलोड गाड्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. सदर मार्ग हा जड वाहनांसाठी अधिकृत नसतानाही काही वाहने या रस्त्यावरून मालवाहतूक करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या टाटा कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक केली जात आहे. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या काही ओव्हरलोड गाड्या भोयरे ते सावळा या ग्रामीण मार्गाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर अशा प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची चर्चा आहे.

तसेच या मार्गावर वाहतुकीसंदर्भात कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा नियंत्रण नसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद ग्रामीण रस्त्यावरून मोठ्या व ओव्हरलोड गाड्या जात असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून अधिकृत तक्रारी पुढे येत नसल्यामुळे हा प्रकार सुरूच असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व वाहतूक विभागाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 
 
 

Comments


bottom of page