
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी आम्ही सर्वजण दिपाली दीपक हुलावळे व समीर जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत
कान्हे, नायगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केला निर्धार

लोणावळा : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडवण्यासाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांचे शिलेदार म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असलेल्या कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार व पीएमआरडीएच्या सदस्य दिपाली दीपक हुलावळे व कामशेत पंचायत समिती गणाचे तरुण तडफदार उमेदवार समीर जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत व आमच्या कान्हे, आंबेवाडी, नायगाव, येवलेवाडी, चिखलसे, कुसगाव खुर्द या सर्व गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या दोन्ही उमेदवारांना मत हीच अजित दादा पवार यांना आमची खरी श्रद्धांजली असेल अशा भावना या नागरिकांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या रक्षा कलश यात्रेचे दर्शन घेताना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी रोजी दुखद निधन झाले. त्यांचा रक्षा कलश हा मावळ तालुक्यामध्ये आणण्यात आला असून मागील दोन दिवस कार्ला पंचायत समिती गणामध्ये तो सर्व गावांमध्ये रथामधून फिरवण्यात आला ज्या नागरिकांना अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीसाठी जाता आले नाही त्या सर्वांना या आरक्षणाच्या माध्यमातून दादांचे अंतिम दर्शन घेता यावे याच उद्देशाने या रक्षा कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. खटकाळा पंचायत समिती घरामधील कान्हे या गावामध्ये मान्यवरांच्या हस्ते रक्षा कलशाचे पूजन करत या पंचायत समिती गणमध्ये रक्षा कलश यात्रा आज सकाळी सुरू करण्यात आली. प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी या रक्षा कलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होत्या. रक्षा करण्याचे दर्शन घेत असताना महिलांच्या व नागरिकांच्या भावना अनावर होत होत्या. अनेकांचे अश्रूंचे बांध फुटत होते. बारामतीच्या धर्तीवर मावळ तालुक्याचा विकास करण्याचे स्वप्न अजितदादा पवार यांनी पाहिले होते व ते स्वप्न आम्ही राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊन पूर्ण करू हीच अजितदादांना आमची श्रद्धांजली असेल अशा भावना या सर्व गावांमधील नागरिक व्यक्त करत होते.

आर्टिफिशल इंटेलिजन्स याद्वारे अजितदादा पवार यांचा एक संदेश तयार करण्यात आला असून तो या सर्व गावांमध्ये नागरिकांना ऐकवण्यात येत होता. अजित दादा पवार यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आज आमदार सुनील शेळके यांच्यावर आली असून सुनील शेळके यांचे हात मजबूत करण्यासाठी दिपाली दीपक हुलावळे व समीर जाधव या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देणे हेच आमचे ध्येय असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. मोठ्या संख्येने या सर्व गावांमध्ये नागरिक या रक्षा कलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना दिपाली दीपक हुलावळे म्हणाले अजितदादा यांचे आकस्मित निधन ही सर्वच नागरिकांसाठी अतिशय दुःखद व धक्कादायक बाब आहे. मात्र अजित दादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आता रडायचं नाही तर डोळे पुसून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या हक्कासाठी कामाला लागा हाच दादांचा संदेश घेऊन आम्ही या पुढील काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू.





Comments