
महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा वाढिवळे (प्रतिनिधी):
🕉️
महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव परिसरात मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून सालाबादप्रमाणे याही वर्षी वाढिवळे येथे भव्य उरूस भरला आहे. उरूसामध्ये खेळणी, फराळ, पाळणे तसेच विविध वस्तूंची दुकाने लागली असून नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे.

तसेच वाडुळे व चिखलचे येथील खिंडीत असलेल्या
केदारनाथ मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली आहे.

यासोबतच कामशेत शहरातील ऐतिहासिक शिव मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून “हर हर महादेव” च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे.
महाशिवरात्री निमित्त उपवास, अभिषेक, रुद्रपाठ व जागरणाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले असून भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.




Comments