top of page
Search

जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या सामुदायिक सोहळा २०२६ च्या अध्यक्ष पदी प्रविण भवार तर महासचिव पदी प्रतिक देसाई….

Feb 27
2 min read

*जनहित चॅरिटेबल ट्रस्ट* च्या वतीने नुकतीच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ ची सोहळा नियोजन समिती जाहीर करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रविण भगवान भवार यांची बहुमताने *अध्यक्ष पदी तर ट्रस्टचे हितचिंतक व सामाजिक कार्यकर्ते प्रतिक सुरेश देसाई यांची महासचिव पदी निवड जाहीर करण्यात आली. ट्रस्टच्या वतिने २०१९ पासून दरवर्षी सामुदायिक मंगल परिणय सोहळा घेण्यात येतो. महाराष्ट्र राज्यात एकमेव सामुदायिक बौद्ध सोहळे करणारी ट्रस्ट म्हणून या जनहित चॅरिटेबल ट्रस्ट कडे अभिमानाने पाहिल जात. या वर्षी देखील हा सोहळा १२ मे २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे *संस्थापक अध्यक्ष* अजय भवार व ट्रस्टचे *सचिव* सचिन कांबळे यांनी नुकत्याच वडगाव मावळ येथील राजमुद्रा बँक्वेट हॉल मध्ये संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त प्रभाकर वाघमारे, संजय गायकवाड, आनंद वंजारी, अनिल गायकवाड,निलेश शिंदे, दलितानंद थोरात, ज्योतीताई शिंदे, संदीप ओव्हाळ, सचिन भवार, ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक / सल्लागार दादासाहेब यादव तसेच सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खालील प्रमाणे २०२६ ची सोहळा नियोजन समिती जाहीर करण्यात आली.


अध्यक्ष - प्रविण भगवान भवार


कार्यक्रम प्रमुख - प्रकाश बा. गायकवाड


उपाध्यक्ष - प्रविण रतन साळवे


महासचिव- प्रतिक सुरेश देसाई


कार्याध्यक्ष - रवी गंगाराम भवार


कोषाध्यक्ष - निलेश मो. गायकवाड

सहसचिव - प्रविण सरोदे

सह कार्याध्यक्ष - संदिप बबन जाधव

सह कोषाध्यक्ष - मनिषा सुभाष ओव्हाळ

संपर्क प्रमुख - भाऊ साबळे व राहुल जाधव


विभागीय उपाध्यक्ष

पवन मावळप पश्चिम विभाग - संदीप कदम

पवन मावळ पूर्व विभाग - प्रफुल्ल भालेसेन

नाणे मावळ - स्वप्नजा भावेश थोरात

अंदर मावळ - तुकाराम डोळस

कामशेत शहर - विपूल जाधव

कान्हे फाटा - हर्षदा गजरमल

वडगांव शहर - आशिष भालेराव

लोणावळा शहर - प्रफुल काकडे

तळेगाव शहर - गोविंद कदम

आंबी/वराळे/नवलाखउंब्रे - राहुल भवार / विवेक शिंदे.

देहूरोड - संकेत जगताप


प्रसिद्धी प्रमुख - सचिन शिंदे, प्रफुल्ल ओव्हाळ, संजय अडसुळे, मनोज मोरे, राजेंद्र कांबळे, महादेव वाघमारे, सुधाकर अभंग, ज्ञानेश्वर वाघमारे, सुभाष भांडे, शारदा ठुले,


संघटक - महेश थोरात, विलास गायकवाड, गणेश गायकवाड, विजय वाघमारे, भागवत बिऱ्हाडे, पुनम उबाळे, नितीन ओव्हाळ, सुनिल सोनवणे, सुरेश शिंदे, समीर उभाळे, रूपाली क्षीरसागर, विलास देसाई, कचरु गायकवाड, विशाल वाघमारे……

आशा प्रकारे सोहळा नियोजन समिती २०२६ ची बांधणी जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतिने करण्यात आली.

सदर पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन महाराष्ट्रतील तमाम विवाह इच्छुक उपासक उपासिका यांना या होऊ घातलेल्या सामुदायिक मागल परिणय सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक समस्सेपासून दूर ठेवण्याचे आव्हान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व वडगाव नगरीचे विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक अजय भवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ट्रस्टचे महासचिव सचिन कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त प्रभाकर वाघमारे यांनी मानले.

 
 
 

Comments


bottom of page