
सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; राज्याच्या राजकारणात नवा इतिहास
मुंबई : राज्याच्या राजकारणात उद्या एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळणार असून सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीमुळे राज्याला पहिली महिला उप मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे जनता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या रुपात पाहत असून, त्याच कार्यपद्धतीने त्या काम करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. स्पष्ट भूमिका, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जाणारे अजित दादा पवार यांच्याच पावलावर पाऊल टाकत सुनेत्रा पवार राज्याच्या विकासाला गती देतील, अशी आशा जनतेला आहे.

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव इतिहासात नोंदले जाणार असून, हा क्षण महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाकडून प्रशासनात पारदर्शकता, गतीमान निर्णय आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्याच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.




Comments